परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी रथसप्तमी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सूर्य प्रतिमा पूजनाने झाली.मुख्याध्यापिकांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सूर्याचे आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले तसेच सूर्यनमस्काराचेही महत्त्व सांगितले.सूर्यनमस्कारामध्ये सर्वांनी सातत्य ठेवा व आपले शरीर सुदृढ करा असे आवाहन केले.
सौ.प्राची गगनग्रास यांनी ग्रह स्तोत्र तसेच गायत्री मंत्र म्हणून घेतला. रथसप्तमीची माहिती सांगून आपल्या संस्कृतीतील सूर्य देवतेविषयी असलेले महत्त्व सांगितले. सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन याबाबत माहिती दिली.
श्री.अशोक मिसाळ यांनी सूर्याची प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली.तसेच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. अर्णवी सावंत व वरद कदम या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रकारे सूर्यनमस्कार घातले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नेहा पाटील यांनी केले अशा प्रकारे अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.