महिला स्त्रीधनाची करून दिली खरी ओळख
आदर्श विद्यालय चिवेली येथील कार्यक्रमात महिलांशी साधला सौ केळकर यांनी संवाद
संतोष कुळे | चिपळूण : स्त्रियांना पूर्वीच्या काळामध्ये व्यक्त होण्यासाठी काही साधन नव्हते. शिक्षणाचा अभाव होता अशा वेळी महिला उखाणे, कोडी, ओव्या यांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत होत्या. उखाणे, कोडी व ओव्यांचा जन्म त्यातूनच झाला असावा. लिहिता वाचता न येणारी महिला खडाखडा बोलत यमकांचा वापर करून आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असत. त्यामुळे मराठी साहित्यातील लोक साहित्य जपण्यामध्ये महिलांचे मोलाचे योगदान असून उखाणे कोडी हे लोकसाहित्य अनमोल आहे, असे मत दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका सौ दिपाली केळकर यांनी आपल्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त केल्या.
चिपळूण तालुक्यातील आदर्श विद्यामंदिर चिवेली या ठिकाणी आयोजित केलेल्या स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभात दिपाली केळकर बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के होते. यावेळी या विचारमंचकावर संस्थेचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के, सत्कारमूर्ती दिनेश शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन यशवंत शिर्के व्हा. चेअरमन संतोष (भाई) कुळे, ग्राम समितीचे अध्यक्ष सुभाष शिर्के मुख्याध्यापक संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये नामवंत उद्योजक दिनेश शिर्के यांचा दिपाली केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इतर मान्यवर आणि आदर्श कामगिरी करणाऱ्या इतर व्यक्तींचा सुद्धा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महिलांची संवाद साधण्यासाठी खास दूरदर्शनवाहिनीवरील ज्येष्ठ वृत्त निवेदिका दिपाली केळकर यांची उपस्थिती लाभली होती. त्यांनी महिलांना या कार्यक्रमातून बोलते केले. स्त्रीधन कार्यक्रम संदर्भात त्यांनी बोलताना सांगितले की, आजची स्त्री जरी शिक्षण घेऊन पुढारलेली असली तरी सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण नसतानाही जे मराठी साहित्य निर्माण झाले त्यात महिलांचा सहभाग मोठा आहे. महिलांनी खास करून पारंपारिक गीते उखाणे ओव्या आणि कोडी यातून साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केलेली आहे. हे साहित्य आजही महिलांना सुद्धा एक दिशा देणारे ठरत आहे. मराठी साहित्याची अनेक दालने आहेत त्यापैकीच लोकसाहित्य महत्त्वाचे आहे त्यांनी सांगितले आपण नेहमीच म्हणतो की, 14 विद्या 64 कला आहे. त्या 64 कलापैकीच उखाणे ही एक महत्त्वाची कला आहे. हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. उखाणे घेणे सोपे नाही असे सांगितले .त्याचबरोबर स्त्रियांविषयी खास बोलताना स्त्रियांना दागिन्याचे आकर्षण असते .मात्र, खरे स्त्रीधन कोणते यावर विचार करताना शिक्षण, आरोग्य, स्वभाव, गुण आणि स्वातंत्र्य हेच स्त्रियांचे खरे स्त्रीधन असल्याचे त्यांनी सांगितले. या साऱ्या गोष्टी समजून देताना त्यांनी उखाणे यांचे प्रकारही विशद केले. फूगडीचे उखाणे, रूखवाताचे, उखाणे , व साधे उखाणे या प्रकारचे उखाण्यातून आपण नेहमीच समारंभ आणि इतर ठिकाणी नाव घेत असतो .असे सांगताना त्यांनी एक उखाणा घेत सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्या म्हणाल्या की, “नाव घेते मी एक आबांची लेक, नाव घेते मी पाहुनी रामचंद्रची मेहुणी,
नाव घेते बहीण सदाशिवरांची लाडकी बहीण
नाव घेते खासी मी आहे यशोदेची मावशी,
अशा माहेरास जाण्यास मी आहे लय खुशी,
पण …रावांच्या मनात शिरले आहे अडकसी..*
यावेळी त्यांनी महिलांना बोलते करत त्यांच्याशी संवाद साधला . काही महिलांनी या उखाणाच्या कार्यक्रमात काही उखाणे सुद्धा बोलून दाखवले. फुगडी असताना जो एक विशिष्ट प्रकारचा पखाज आवाज काढला जातो, तो आवाज जयश्री तांबिटकर व सौ. भेकरे या महिलानी काढला. त्याचबरोबर वृत्त निवेदिका म्हणून काम करत असताना आपले अनुभव सर्व महिलांची मोकळेपणाने सांगत बातचीत केली. जसं महिलांचे साड्यांकडे व स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष असतं तसं पुरुषांचे सुद्धा स्त्रीच्या साडी आणि सुंदर दिसण्याकडे बारीक लक्ष असते. एका कार्यक्रमातून त्यांना जाणवलं एक गमतीदार प्रसंग त् कथन करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रम दोन तास रंगला होता. या कार्यक्रमाला बामणोली, वाघीवरे, चिवेली व गोंधले या ठिकाणातून अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त सौ शौर्या नरेश पागडे , द्वितीय स्मिता शांताराम वणे व तृतीय जान्हवी मंदार साळुंखे यांचा अनुक्रमे पैठणी व साडी देत प्रमुख पाहुणे दिपाली केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सल्लागार अशोक वनगे, रवींद्र शिर्के संतोष गोरिवले, विजय शिर्के, संतोष शिबे, अनंत शीबे, सुभाष शिबे, राजेंद्र निवारा ट्रेडर्सचे मालक भालचंद्र जोगळे, युवासेना उप तालुका प्रमुख प्रीतम वंजारे, युती सेनेच्या निशाताई अहिरे, शाखाप्रमुख सागर शिर्के, त्याचबरोबर स्कूल कमिटी सदस्य, शाखा समिती सदस्य ,पालक, ग्रामस्थ, महिला, शिक्षक , शिक्षकत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश शिर्के यांनी केले तर सूत्रसंचालन प्रज्ञा शिर्के व संजना काणसे यांनी केले. आभार नितीन गुरव यांनी मानले.