निवृत्ती वेतनधारकांची समन्वयसमिती गठीत करण्यासाठी उद्या बैठक

Google search engine
Google search engine

जिल्हा परिषद सेवा निवृत्तीवेतन धारकाच्या विविध संवर्गातील विविध संघटना आहेत.प्रत्येक संघटना आपापल्यापरीने काम करीत आहेत.तरीसुद्धा जि.प./पं.स.प्रशासन दाद देत नाही. निवृत्तीवेतनधारकांचया समस्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत.
वारंवार तालुका व जिल्हा अदालतीतही समस्या मांडून उपयोग होत नाही.
कोकणातील गणेश उत्सवा सारख्या महत्वाच्या सणाकरीता निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेसाठी शासनाने आदेश काढूनही कालच्या गणेश उत्सवाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निवृत्तीवेतनाचा लाभ वेळीच मिळू शकलेला नाही.
या सर्व बाबींचा विचार करता सेवानिवृत्ती धारकाच्या विविध समस्यांचे वेळीच निवारण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे.त्याकरिता सर्व संघटनांची मिळून जिल्हास्तरावर एक “समन्वयसमिती” गठीत करणे गरजेचे आहे.
त्याकरता शनिवार दिनांक 15 /10 /2022 रोजी सकाळी 10 वा.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारकाच्या संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्वानी सदर सभेस वेळीच उपस्थित रहावे, हि विनंती.
सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश राणे,रावजी यादव,रविकांत मुसळे,बाबली वायंगणकर,चंद्रकांत पाटकर,राजश रेगे,हनुमंत प्रभू  यांनी केली आहे