गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील झोबंडी नं १ प्रशालेचे उपक्रमशिल, तंत्रस्नेही उपशिक्षक सतिश मुणगेकर यांना नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समूहातर्फे अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या “नवी दिशा नवे उपक्रम” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नुकताच राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे संपन्न झाला. या पुस्तकात सतिश मुणगेकर यांच्या “माझे स्वनिर्मित ॲप” या नवोपक्रमाचा समावेश आहे या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक रमाकांत काठमोरे साहेब,माजी उपसंचालक विकास गरूड साहेब,उपप्रशासकीय अधिकारी पुणे म.न.पा..शुभांगी चव्हाण मॅडम, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर साहेब,विजय आवारे, शिवाजी खांडेकर संचालक राष्ट्र सेवा दल पुणे,सचिन डिंगळे,बाळकृष्ण चोरमले,राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती सतिश मुणगेकर यांच्यावर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..