पाटपन्हाळे महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन कॉन्व्हर्सेशन स्किल इन इंग्लिश कोर्सची यशस्वी सांगता

पाटपन्हाळे | वार्ताहर : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन कॉन्व्हर्सेशनल स्किल्स इन इंग्लिश कोर्सची यशस्वी सांगता दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली. सदर कोर्स हा महाविदयालयातील इंग्रजी विभागामार्फत १३ सप्टेंबर २०२२ ते २३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान राबविण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. पी. ए. देसाई यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले. सदर तीस तासांच्या या कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून रोल प्ले, वादविवाद, चर्चासत्र, व्याख्याने, इत्यादी माध्यमांचा वापर करून इंग्रजी भाषेतून संभाषण कौशल्य शिकविण्यात आली. एकूण २३ विद्याथ्यांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका आणि कोर्स समन्वयिका प्रा. सौम्या चौघुले यांनी या कोर्सच्या माध्यमातून संभाषणासाठी लागणाऱ्या इंग्रजी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत कसे पोहोचवले आणि अभ्यासक्रम तपशीलवार मांडला. यावेळी कोर्समध्ये सहभागी कु. दिक्षा पवार, कु. सोनिया पावसकर, कु. गुंजन पटेल. कु. प्राजक्ता रावणंग या विद्यार्थिनींनी प्रतिनिधिक मनोगते व्यक्त केली.यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई यांनी कोर्सच्या यशस्वीतेसाठी कोर्स समन्वयिका सौम्या चौघुले तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सहभागी विद्यायांमध्ये इंग्रजी भाषेच्या संभाषणात झालेले सकारात्मक बदल नक्कीच आशावादी असल्याचे प्रतिपादन केले, तसेच सर्व महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी स्वतःच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी अशा कोर्सेसचा नक्की उपयोग करून घ्यावा असे सांगितले.या कार्यक्रमाला डॉ. प्रसाद भागवत, डॉ. जे एस जाधव आणि पा. कांचन कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नीटनेटकं सूत्रसंचालन प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी कु. दीप्ती पालकर व कनिष्का देवळेकर यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी दिक्षा पवार हिने मानले.