कोकण युवा पुरस्काराचे होणार वितरण
संतोष कुळे | चिपळूण : अखिल कोकण युवा संघ ट्रस्ट पुणे शहर यांचा सातवा वर्धापन दिन आणि कोकण युवा भूषण पुरस्कार वितरण सोहळा 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा समृद्धी लॉन्स गार्डन मंगल कार्यालय धायरी पुणे या ठिकाणी होणार आहे. यावेळी स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी अखिल कोकण युवा संघ पुणे स्नेहमेळावा आणि कोकण युवा भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करून पुणे येथे असणाऱ्या सर्व कोकणातील बांधवांसाठी कार्यक्रमाची मेजवानी देत असते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रामध्ये अखिल कोकण युवा संघाचे योगदान फार मोलाचे आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे या संघाचे अध्यक्ष उद्योजक किसन भोसले असणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खा. सुप्रिया सुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत पाटील, महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र राज्य सौ रूपाली चाकणकर , खडकवासला आ. भीमराव तापकीर, महाडचे आ.भरत गोगावले, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर दीपक मानकर, पुणे मनपा विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, कोथरूडचे माजी आ. चंद्रकांत मोकाटे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना संजय कदम, त्याचबरोबर कोकणातील उद्योजक सुद्धा उपस्थित राहणार आहेत, यामध्ये नक्षत्र फार्मिंग ज्वेलरी संचालक संतोष मेढेकर, कमता हॉस्पिटलचे संदीप उतेकर, स्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. संचालक निलेश चव्हाण, स्वप्निल ट्रेडर्सचे सुनील मोरे, हॉटेल समृद्धी संचालक अरविंद चव्हाण, शिंदे एंटरप्राइजेस रवींद्र शिंदे, सचिन पार्टे, शंकर खरोसे, कृष्णा कदम, चंद्रकांत जाधव आधी उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये कोकण भूषण पुरस्कारचे मानकरी आहेत, उद्योजक चंद्रकांत मोरे, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे संतोष गोपाळ, सामाजिक कार्यामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सौ रूपाली निवदेकर, उद्योजक राजेश पवार यांना कोकण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना, लकी ड्रॉ, सोन्याची नथ, मानाची पैठणी आणि शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रत्यक्ष दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला कोकणातील अनेक संघटना उपस्थित राहणार आहेत. अखिल कोकण युवा संघ पुणे यांच्या या मेळावा आणि हळदीकुंकू व पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व कोकणवासी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गणेश जाधव सचिव सचिन उतेकर, खजिनदार सुरेश शिगवण सर्व पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.