रत्नागिरी : खारवी समाज सेवा मंडळ मुंबई स्थित खारवी समाजाचे स्नेहसंमेलन मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे समाजसेवक मा.श्री.गंगाधरजी तावडे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे समाजसेवक यशवंतजी डोर्लेकर, कै. रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था पनवेल अध्यक्षा – सौ. आंबेरकर, संचालक अमोल आंबेरकर,खारवी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकरजी लाकडे मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत हरस्कर ,भजनसम्राट भगवानबुवा लोकरे,मंडळाचे माजी अध्यक्ष पामाजी वासावे,महीला अध्यक्षा सौ.मिनाताई पावसकर व मान्यवर आणि समाज बंधु-भगिनींच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले.या स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महिलाचे हळदीकूंकु, सांस्कृतीक कार्यक्रम, मान्यवरांचा सत्कार,विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा,मंडळाच्या माध्यमातून आश्रय दाते लधानी कुटुंबियांकडून मंडळाचे अध्यक्ष-शंकरजी लाकडे यांनीसमाजातील निराधार कुटुंबाला साडी चोळी भेट मिळवून दिली.तसेच समाजातील स्वयंसिध्द महीला बचत गट मुंबई यांनी आर्थिक मदत केली. .इतर समाज सेवेशी निगडीत बंधु-भगीनींचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांनी समाज पररबोधनपर भाषणे केली.मंडळाचे अध्यक्ष श्री. लाकडे म्हणाले गावोगावी समाजातील मुले शिकत आहेत. विविध शैक्षणिक शेत्रात उज्वल यश संपादन करीतआहेत. त्यांच्या शिक्षणाचे चिझ व्हावे म्हणून ते मुंबईत येण्यासाठी प्रयत्नात असतात. परंतु मुंबई मध्ये त्यांची राहण्यासाठी सोय होत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली जाते. त्यामुळे मंडळाने दूरदृष्टी ठेवून धाडसी निर्णय घेतला आहे तो म्हणजे महामुंबई मध्ये मंडळाची जागा असणे. त्याकरीता मंडळाने निधी संकलनाचे काम हाती घेतलेले आहे. त्याला आपण यथाशक्ती मदत करावी.