रश्मी सावर्डेकर यांना ‘बेस्ट सेक्रेटरी रीजन’ पुरस्कार

चिपळूण | वार्ताहर : द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचा यावर्षीचा रिजन पाचचा ‘बेस्ट सेक्रेटरी’ हा पुरस्कार लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या सेक्रेटरी लायन रश्मी प्रवीण सावर्डेकर यांना प्राप्त झाला आहे. दापोली येथे पार पडलेल्या विभागीय परिषदेत प्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पितांबरी फार्म व ॲग्रो टुरिझम साखलोली दापोली येथे पार पडलेल्या अस्मिता विभागीय परिषदमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यातील एकूण १९ लायन्स क्लबचे सभासद, पदाधिकारी सहभागी झाले होते. या सर्व क्लबच्या चालू वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन विविध पुरस्कार या विभागीय परिषदेत देण्यात आले. सौ. रश्मी सावर्डेकर यांच्या सेक्रेटरी पदाचे व त्या पदाला न्याय देण्याचे दृष्टीने त्यांनी केलेले उल्लेखनीय काम याचा गौरव म्हणून त्यांचा बेस्ट सेक्रेटरी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कौन्सिल चेअरमन श्री. जालाव, प्रथम उपप्रांतपाल श्री. निंबाळकर, रिजन चेअरमन आशिष मेहता, द्वितीय उपप्रांतपाल श्री. पाटील, कॉन्फरन्स चेअरमन अरुण गांधी, रिजन सेक्रेटरी मनोहर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिरंग चेस अॅकॅडमीच्या माध्यमातून चिपळुणात बुद्धिबळाचे प्रशिक्षण देणाऱ्या सौ. रश्मी सावर्डेकर यांनी आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय आपले कुटुंबीय व सर्व लायन सभासदांना दिले आहे.