प्रधानमंत्री आरोग्य योजनच्या लाभार्थ्यांची मंडणगड नगरपंचायतीचेवतीने ई. के.वाय.सी नोंदणी

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीचे माध्यमातून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनच्या लाभार्थी नोंदणीसाठी ई. के.वाय.सी अभियान राबवण्यात येते आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीकांनी या अभियानाचा लाभ घेतला. उपजिल्हा रुग्णालय कळंबणी तालुका खेड येथील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजन व आयुष्यमान भारत योजनेतील आरोग्य मित्र नरेश मोरे, प्रियांका मोरे या कर्मचाऱ्यांनी लोकांना मार्गदर्शन खेले. आयुष्यमान भारत योजने अंर्तगत नगरपंचायत कार्यक्षेत्रातील समविष्ठ नागरीकांना मोफत उपचार मिळावेत या करिता ई के.वाय.सी. करण्यात आली. मंडणगड नगरपंचायतीमधील आशा सेविका श्रीमती भुमिका पोस्टुरे, सौ. मानसी सापटे यांनी देखील या अभियानास सहकार्य केले. मोफत नोंदणीकरिता नागरीकांची उत्तम सहकार्य लाभत असून अद्याप नोंदणी न केलेल्या नागरीकांनी आपली नोंदणी प्रक्रीया पुर्ण करण्याचे आवाहन मंडणगड नगरपंचायतीचेवतीने करण्यात आले आहे.