कणकवली इंजिनीरिंग कॉलेज, कणकवली ने आयोजित केलेल्या व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त सेमिनार अभियानास साधारण ५० कर्मचाऱ्यांचा व ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी कणकवली इंजिनीरिंग कॉलेज ,कणकवली येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ,पुणे यांच्यामार्फत “स्टार्ट-अप इंडिया आणि उद्योजकता जागृती” यासंबंधी सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
मुंबईत सुरू झालेली प्रबोधिनी संस्था आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून सन २००६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाकडून “विशेष सहाय्यक संस्था” म्हणून मान्यताप्राप्ती मिळाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हातील नवउद्योजकांना चालना मिळावी, तरुण उद्योजक बनावेत, लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत मिळावी आणि स्किल डेव्हलपमेंट पर्यायाने होण्यास संधी मिळावी यासाठी सदर सेमिनारचे आयोजन फक्त विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वच लोकांसाठी खुले करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी तसेच स्टार्ट-अप इंडिया आणि उद्योजकता विकास या माध्यमांतून प्लॅटफॉर्म मिळण्यास मदत व्हावी हा आयोजित कार्यक्रमाचा मूळ हेतू होता.
यासंदर्भात कार्यक्रमासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणेच्या कार्यकरी प्रमुख स्वाती महाळंक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच प्रबोधिनीचे प्रशिक्षक सुर्यकांत माडे आणि प्रा. प्रदीप पाटील यांनी स्टार्ट- अप इंडिया व उद्योजकता यांच्यातील परस्पर संबंध, उद्योजकीय व्यक्तिमत्व व त्यातील नवसंधी या विषयांवर प्रकाशझोत टाकला.
संबंधित कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनीश गांगल यांनी विशेष प्रयत्न केले. आयोजित कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक कल्पेश कांबळे तसेच सह- समन्वयक म्हणून प्राध्यापक सौरभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. सदर उपक्रम राबवण्यासाठी मदतनीस विद्यार्थ्यांमधून आदित्य डोयले, चैतन्य आरेकर, राहुल पवार, मंदार शेट्ये, हर्षल गावडे, यश मेस्त्री, रघुवीर सावंत, आदित्य चौघुले, आदेश सावंत, तेजस नाईक, ओमकार सावंत, सुरज रावळ, असजद बेग, योगिता लोके, सुकन्या गावकर, श्रावणी म्हस्कर, निमात शेख, प्राजक्ता नाईकधुरे, कोमल कदम, प्राची बांदेकर यांनी कामगिरी बजावली.आयोजित कार्यक्रमासाठी एस एस पी एम संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्राचार्य डॉ. अनीश गांगल, उपप्राचार्य डॉ. महेश साटम व प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले.