सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ
डॉ. राजेंद्र बर्वे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे अंतर्गत गुणवत्ता आश्वासक कक्ष आणि मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी मानसशास्त्र परिषदेचे’ आठवे राष्ट्रीय आणि ३५ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन ३ व ४ फेब्रुवारी रोजी होत आहे .
‘कोविड पश्चातचे स्वास्थ्य आणि आव्हाने’ या विषयावर दोन दिवसीय परिषद होत असून प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्र मधून सुमारे दोनशे प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कोविड नंतरची बदललेली जीवनशैली व त्याचे परिणाम,मानसिक स्वास्थ , निराशावाद , औद्योगिक व आर्थिक परिणाम ,आरोग्य अशा विविध कोविड संबंधीत विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेले आहेत. यावेळी विविध विषयावर संशोधन पेपरचे सादरीकरण होणार आहे. या परिषदेसाठी मराठी मानसशास्त्र परिषद अध्यक्ष डाॅ.मोहन निंबाळकर बारामती, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे औरंगाबाद,सचिव श्री कालिदास पाटील इस्लामपूर,सचिव डॉ. प्रीतम कुमार बेदरकर अहमदाबाद,प्राचार्य डाॅ. पुंडलिक रसाळ ,प्राचार्य डॉ.दिगंबर दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत
खेमसावंत भोंसले आणि राणीसाहेब श्रीमंत
शूभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते होणार आहे .याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले ,युवराज्ञी
सौ.श्रद्धाराजे भोंसले,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या परिषदेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ डी.एल.भारमल यांनी केले आहे.