सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत गावडे यांचे निधन

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत साबाजी गावडे (६६, रा. गेळे) यांचे बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले.
आठ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, बुधवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी वनविभागात कणकवली , कुडाळ , तरळे, दोडामार्ग येथे ३४ वर्ष सेवा बजावली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुली , जावई , नातवंडे , पुतणे, पुतण्या , भाचे , भाच्या असा परिवार आहे. ओरोस सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिपरीचारिका सौ. श्रीप्रिया धुरी यांचे ते वडील तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसेविका सौ. प्राची राणे यांचे ते काका होत.