माजगाव गावातील महिलांना गारमेंट उद्योगाबाबत मार्गदर्शन

मानव साधन विकास संस्था अंतर्गत सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्राच्यावतीने आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : मानव साधन विकास संस्था अंतर्गत सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्राच्यावतीने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने माजगाव गावातील महिलांना गारमेंट उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी दिल्ली येथील सेवा भारत संस्थेच्या प्रतिनिधी श्रीम. प्रियांका, श्रीम. अयमान, श्रीम. कविता आदी उपस्थित होत्या.
या मार्गदर्शन मेळाव्याच्या व्यासपीठावर माजगांव सरपंच डॉ. अर्चना सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सिंधुदुर्ग परिवर्तन संस्थेचे विलास हडकर, उपसरपंच संतोष वेजरे, ग्राम विकास अधिकारी संदीप गोसावी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय सावंत, सदस्य संजय कानसे, अशोक धुरी, प्रज्ञा भोगण, विशाखा जाधव, गिता कासार, मधु कुंभार, श्रद्धा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी दिल्ली येथील सेवा भारत संस्थेच्या प्रियांका, अयमान, कविता यांनी गावातील गारमेंट उद्योग करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक शिवणकामची माहिती जाणुन घेत महिलांना सक्षमीकरणासाठी पर्यायाने त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी माजगावात गारमेंट उद्योग साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मानव साधन विकास संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत देशातील २० लाख महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगावातून या याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गिता कासार यांनी तर आभार मधु कुंभार यांनी मानले.