भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन

Google search engine
Google search engine

मराठा बिजनेसमन फोरम रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने आयोजन

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सशस्त्रसेने मध्ये ( Army , Navy , Airforce) अधिकारी पदावर निवड होण्यासाठीची (NDA , NA ,TES इ. प्रवेश परीक्षा) परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन मिळविण्याकरीता मराठा बिजनेसमन फोरमने प्रमुख मार्गदर्शक म्हणून, रिटायर्ड मेजर जनरल डॉ. विजय पवार (AVSM,VSM) यांचे रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत हॉटेल विवेक, रत्नागिरी येथे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.

याप्रसंगी माजी मुख्य आयकर आयुक्त व एम्. बी. एफ. चे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. अरुण पवार उपस्थित रहाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थी , शिक्षक, पालक व संबंधित संस्था यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.