पाटपन्हाळे महाविदयालयातील विदयार्थ्यानी अनुभवले मार्केटिंगचे धडे

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयामध्ये शुक्रवार दिनांक २७ ते मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी महाविदयालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने कॉमर्स फेस्टचे २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाणिज्य प्रश्नमंजुषा, पीपीटी सादरीकरण, पुस्तक परिक्षण, फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वात शेवटी आणि आकर्षणाची स्पर्धा म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होती. विदयार्थ्याच्या व्यावसायिक गुणांना वाव मिळावा, त्यांना मार्केटिंग कौशल्ये समजावीत, त्यांच्या ज्ञानात व आत्मविश्वासात वाढ व्हावी तसेच केवळ पुस्तकी ज्ञान न घेता व्यावहारिक अनुभव यावा आणि प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तु विक्री करण्याचा अनुभव यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये २२ गट होते व प्रत्येक गटामध्ये ४ विदयाथ्र्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक गटासाठी मार्केटिंग करण्यासाठी वेगळी वस्तु देण्यात आली होती.

यामध्ये गुहागर तालुक्यातील खातू मसाले प्रॉडक्ट, अमोरे येथील शंतनु प्रॉडक्ट, रामबंधु मसाले, इडली, विविध कंपन्याच्या साडी, विरी पत्रावली, पापड, कुरडई, चकली, कोकम पदार्थ, पर्स आणि घरगुती अशा विविध वस्तुंचा समावेश होता. प्रत्येक गटातील विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष शुगांरतळी, गुहागर, आबलोली, तळवली बाजारपेठ तसेच पालपेणे, वडद, निगुडळ, वेळंब, चिखली, जानवळे, असगोली आणि परचुरी गावात जावुन मार्केटिंग केले. सर्व गटानी मिळून एक लाखापेक्षा अधिक विक्री केली आणि ख-या अर्थाने विदयार्थ्याना याव्दारे व्यावासायिक आणि मार्केटिंगचा अनुभव मिळाला. प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतर त्याचे सादरीकरण महाविदयालयात केले. त्याचे परिक्षण चिपळुण लायन्स क्लब गॅलेक्सीच्या अध्यक्षा तेजल पेढांबकर आणि प्रसिध्द उदयोजक श्री शामकांत खातु यांनी केले. परिक्षण करताना विदयार्थ्यानी आपल्या वस्तुचे प्रभावी असे सादरीकरण करून आपले अनुभव सांगितले. तसेच परिक्षकानी देखील विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.

बक्षिस वितरणावेळी आपल्या मार्गदर्शनात तेजल पेढांबकर यांनी विदयार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून व्यवसाय क्षेत्रात प्रामुख्याने आत्मविश्वास व्यक्तीमत्व आणि संवाद कौशल्याच्या जोरावर अवघड आव्हान असले तरी व्यवसायात उदयोजक बनणे अवघड नक्कीच नाही हे स्पष्ट केले. मा. शामकांत खातु यांनी देखील विदयार्थ्यांनी व्यवसायाचा विचार केल्यास गुहागरमधुनच चांगले उदयोजक पुढे येतील आणि त्याची सुरुवात महाविदयालयातुन झाली असे गौरवोदगार काढले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास तीन हजार, दोन हजार, एक हजार असे रोख बक्षिस, प्रमाणपत्र व ट्रॉफी असे स्वरूप होते. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस व ट्रॉफी टी वाय बी कॉमच्या प्रणव टाणकर, हिमांशु साळवी, कल्पेश खांडेकर, सोनिया पावस्कर या गटाने खातु मसाले प्रॉडक्ट वस्तुचे मार्केटिंग करून मिळविले. द्वितीय क्रमांक ईश्वरी संसारे, स्वेता शितप, दिप्ती कावणकर, सेजल झोरे या एस वाय बी कॉमच्या गटाने असोरे येथील शंतनु प्रॉडक्ट वस्तुचे मार्केटिंग करून मिळविले. तृतीय क्रमांकाचे बक्षिस दिक्षा बागकर, रूतुजा साळवी, वसुधा भागडे, वैष्णवी धामणस्कर या एफ वाय बी कॉमच्या गटाने विरी पत्रावळी या वस्तुचे मार्केटिंग करून मिळविले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागप्रमुख प्रा, एस एस खोत, प्रा. पी एस भागवत, ग्रंथपाल श्री गुरव धनंजय, त्रिशला साबळे आणि प्राचार्य प्रमोद देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.