lकणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय उडान महोत्सव ३ फेब्रुवारी रोजी

Google search engine
Google search engine

कणकवली | प्रतिनिधी : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या वेळेत येथील एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात जिल्हाभरातून ३०० विद्यार्थी व प्राध्यापक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सांस्कृतिक विभागाच्या युवा महोत्सवाच्या धर्तीवर उडान महोत्सवाचे आयोजन जिल्हा स्तरावर केले जाते.
यावर्षी कणकवली महाविद्यालयात हा महोत्सव होत असून सहभागी विद्यार्थी कलाकार पथनाट्य, क्रिएटिव्ह स्टोरी रायटिंग पोस्टर मेकिंग, वक्तृत्व या कला प्रकारांचे सादरीकरण करणार आहेत.
या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. प्रदीप कामथेकर, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजु एसडीओ डॉ. संदीप साळुंखे, सर्व संस्था पदाधिकारी, व तज्ज्ञ परिक्षक उपस्थित राहणार आहेत.
या जिल्हा स्तरीय उडान महोत्सवासाठी प्राध्यापक प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.