झाराप येथे ३ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती

Google search engine
Google search engine

वेंगुर्ला : प्रतिनिधी
सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यावतीने शुक्रवार दि.३ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन उत्सव आयोजित केला आहे.यानिमित्त सकाळी ८ वा. ध्वजारोहण, श्री विश्वकर्मा पूजन, १२ वा. मान्यवरांचे स्वागत व समाज प्रबोधन, दु. १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. सिधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार, ५ वा. ज्ञातीतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ६ वा. निमंत्रितांची भजने, १०.३० वा. माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. खेळ पैठणीचा, ७ फेब्रुवारी सामुदायिक मौजीबंधन कार्यक्रम होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी मंडळातर्फे केले आहे.