ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य जनजागृती मोहिमेच्या मोबाइल व्हॅनचा कणकवलीत शुभारंभ

प्रांताधिकारी जगदीश काटकर व तहसीलदार शिक्षण देशपांडे यांनी दाखवला हिरवा झेंडा

कणकवली :

प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ येथील तहसिलदार कार्यालय येथे प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी शुभारंभ करून हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी निवासी नायब तहसिलदार गौरी कट्टे, निवडणूक नायब तहसिलदार प्रिया हर्णे, संभाजी खाडे, देवेंद्र जाधव, श्री. राणे, श्रीमती आडारकर आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्ययाबाबत जनजागृती मोहिम २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे राबविण्यात येणार आहे. मतदारांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्ययाबाबत माहिती देणेसाठी सदरील प्रात्यक्षिक केंद्रात प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी या जनजागृती मोहिमेत मतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जगदिश कातकर व दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.