मंडणगड | प्रतिनिधी : बोधी ट्री एज्युकेशन फाऊंडेशन औरंगाबाद यांच्यावतीने सन 2023 सालासाठी देण्यात आलेला राजस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरी नंबर 1 या शाळेतील उपशिक्षिका रसिका रेवाळे यांना औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शैक्षणीक, सामाजीक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेल्या
कार्याची दखल घेऊन सिनेअभिनेत्री प्रितीक्षा शिवणकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल शाळेच मुख्याध्यापक शिक्षक वृंद, स्थानीक व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचेवतीने त्यांचे अभिनंद करण्यात आले आहे.