मंडणगड | प्रतिनिधि : कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्याने तालुक्यातील भाजपा व बाळासाहेबांच्या शेवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील मुख्य चौकात फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विश्वदास लोखंडे, कार्याध्यक्ष अप्पा मोरे, काजल लोखंडे, सरचिटणीस गिरीष जोशी, पुष्पराज कोकाटे, राजेश नगरकर, विजय शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, शहर प्रमुख विनोद जाधव, निलेश गोवळे, प्रविण जाधव, अनंत लाखण, सिध्देश देशपांडे, नागेश घोसाळकर, प्रमिला किंजळे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.