धुत्रोली येथे 4 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यस्तरीय गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी :  संभुराजू तुरेवाली सांस्कृतिक उन्नती मंडळ यांच्यावतीने 4 फेब्रुवारी 2023 रोजी मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे राज्यस्तरीय गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यतील बारा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या निमीत्ताने सांयकाळी 4.00 वाजता गुरुवर्य सद्भभावना स्मृतिज्योत रँली मुळगाव ते मंडणगड, प्रमुख मान्यवर गुरुवर्य शाहिर स्वागत सोहळा सांयकाळी 6.00 वाजता, गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा रात्री 9.00 वाजता आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, माजी खासदार अनंत गीते, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुर्यकांत दळवी, तहसिलदार विजय सुर्यवंशी, माजी पालकमंत्री आदीती तटकरे, संभूराजू घरण्याच गुरुवर्य पांडुरंग नांदविकर, पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी विशाल जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे व्यवस्थापक जय हनुमान सेवा मंडळ धुत्रोली हनुमानवाडी, जय हनुमान सेवा मंडळ मुंबई, ससुंगती महिला मंडळ धुत्रोली हनुमानवाडी, ओम शिवशंभु उन्नती कला मंडळ रत्तागिरी – रायगड संभुराजू घराणे यांच्यावतीने करण्यात आले असून तालुकावासीयांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश घडवले यांनी केले आहे.