शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील ओंकार पवार याची सहाय्यक दुय्यम निबंधक पदी निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवलीतीमधील माजी विद्यार्थी कु.ओंकार पवार याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सहाय्यक दुय्यम निबंधक पदी नुकतीच निवड झाली.

कु.ओंकार याने शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथुन कृषी शाखेची पदवी संपादन केली व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथुन त्याने मृदा शास्त्र विभागातुन स्वतःचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कु. ओंकार याने संपादन केलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार शेखर निकम, प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले व त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय, सर्व शिक्षक व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.