सुतार – पांचाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
वैभववाडी | प्रतिनिधी : श्री विराट विश्वकर्मा सुतार – पांचाळ समाज मंडळ वैभववाडी च्या वतीने विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पदाधिकारी डी. के. सुतार यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच वकील परीक्षा उत्तीर्ण झालेली पूजा सुतार हिचा देखील सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सुतार, उपाध्यक्ष डि.के. सुतार, सचिव बाळा पांचाळ, खजिनदार संतोष सुतार, तसेच गणपत सुतार, उत्तम सुतार, सूर्यकांत सुतार, नंदकुमार पांचाळ, संतोष सुतार, मधुकर सुतार, तुकाराम सुतार, पांडुरंग सुतार, योगेश सुतार, गणपत सुतार, विश्वनाथ पांचाळ, नाना सुतार, शंकर सुतार, रामभाऊ सुतार, मंदार सुतार, पूजा सुतार, संतोष कुडाळकर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पूजाविधी तुकाराम सुतार यांच्या हस्ते तर पोती वाचन बाबाजी सुतार यांनी केले. यावेळी अध्यक्ष प्रताप सुतार म्हणाले, शासन दरबारी असलेल्या समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जाईल. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाज कायम आहे. संघटना वाढीसाठी सर्वांची एकजूट महत्वाची आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम सुतार यांनी तर आभार बाळा पांचाळ यांनी मानले.