करसल्लागार असोसिएशन, सीए ब्रॅंचच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करताना आंतरराष्ट्रीय खो खो पटू अपेक्षा सुतार.

करसल्लागार असोसिएशन, सीए ब्रॅंचच्या क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खो- खो पटू अपेक्षा सुतार हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू झाल्या. या मध्ये क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टग ऑफ वॉर या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. सुमारे दीडशे जणांनी यात भाग घेतला आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. या स्पर्धेकरिता एंजल ब्रोकिंग रत्नागिरी शाखेचे सहकार्य लाभले आहे. या वेळी अपेक्षाचा सत्कार करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरद पंडित यांनी केला. त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. करसल्लागार असोसिएशन व सीए ब्रॅंचच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा, असे मनोगत व्यक्त केले.

उद्घाटनावेळी ज्येष्ठ सीए, ज्येष्ठ करसल्लागार, कर्मचारी, करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरद पंडित, सीए वैभव देवधर, सीए अभिजित पटवर्धन, सीए मंदार गाडगीळ, सीए श्रीरंग वैद्य, राजेश सोहोनी, सीए ब्रॅंचचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर, सीए केदार करंबेळकर, सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे, सीए ऋषिकेश फडके, सीए शरद वझे, चंद्रशेखर साप्ते, जहूर हकीम, राजेंद्र भावे, सीए प्रसाद दामले, सीए अभिजित चव्हाण, सीए चैतन्य वैद्य, यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी उपस्थित होते.