रत्नागिरी | प्रतिनिधी : गेली ५ वर्ष, काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्याकरिता प्रयत्न करत आहेत. काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्हा च्या माध्यमातून दिनांक ११ आणि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रिया धारक यांना उभारी मिळण्याकरिता राज्यस्तरीय काजू परिषदेचे नियोजन करण्यात आले.आहे.
यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांकरिता लागवड,नियोजन,अर्थकारण,बाजारभाव , तसेच काजू उद्योजकांकारिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच काजू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.
दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, संगमेश्वर-चिपळूण चे आमदार शेखर निकम, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानपरिषद आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, विधानपरिषद आमदार प्रसाद लाड, उद्योगपती किरण सामंत हे उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून अनेक शेतकरी, तसेच इतर राज्यातून काजू व्यावसायिक,काजू व्यापारी, यंत्रसामग्री तयार करणारे कारखानदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्हा चे अध्यक्ष विवेक बारगीर यांनी दिली.