बांदा डॉ. व्ही. के. तोरसकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे निधन

Google search engine
Google search engine

असनिये गावात शोककळा

बांदा | प्रतिनिधी : बांदा येथील खेमराज हायस्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी क्रांती कृष्णा नाईक (१६, रा. असनिये) हीचे शुक्रवारी रात्री दुर्दैवी निधन झाले. तीला उच्च मधुमेहाचा त्रास होता. प्रशालेत ती हुशार विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. आजारी असूनही ती कायम प्रशालेत येत असे.

गुरुवारी सकाळी तीला प्रशालेत असताना त्रास जाणवला. शिक्षकांनी ताडीने तीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर ती घरी गेली. मात्र तीचा त्रास कमी झाला नाही. तीला नातलगांनी अधिक उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे दाखल केले. तरीही तीचा त्रास कमी न झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारा दरम्यान तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने तीला बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांना तीची प्रकृती साथ देत नव्हती. अखेर शुक्रवारी रात्री तीची प्राणज्योत मालवली.
क्रांती ११ वी कला शाखेत शिकत होती. अत्यंत प्रेमळ, अभ्यासू अशी तीची ओळख होती. बांदा प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम. एम. सावंत यांनी असनिये येथे तीच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. बांदा प्रशालेतही तीला श्रद्धांजली वाहण्यात आली. तीच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. क्रांतीच्या निधनाने असनिये गावावर शोककळा पसरली आहे.