सातवेळा हा पुरस्कार पटकाविणारी ही तालुक्यातील एकमेव पतसंस्था
लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या जनता सहकारी नागरी पतसंस्था लांजाला सलग सातव्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे. सातवेळा हा पुरस्कार पटकाविणारी ही तालुक्यातील एकमेव पतसंस्था आहे.महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्यावतीने बँको ब्लू रिबन पुरस्कार देण्यात येतो. २० ते २५ कोटी ठेवींच्या गटातून उत्तम गुण क्रमांकानुसार पतसंस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. जनता सहकारी नागरी पतसंस्थेने सलग सातव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
कोविड काळात पतसंस्थेने सभासद, ठेवीदारांना व सर्व खातेदारांना आवश्यक ती सेवा पुरवली. वेळेप्रसंगी संस्थेने कोरोना कालावधीत ग्राहकांना घरपोच सेवा दिली आहे. संस्थेच्या ठेवीत सातत्याने झालेली वाढ, केलेला पाठपुरावा, केलेली कर्जवसुली, ग्राहकांना उत्तम सेवा, सदैव तत्परता आणि सभासदांची मिळालेली साथ यामुळे संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संस्थेने आपल्या सभासद, ग्राहकांशी अतूट नाते निर्माण केले आहेे. संस्थेचे कार्यालय वातानुकूलित आणि संगणकीकृत असून संस्थेच्या सभासदांना उत्तम सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेकडे सोनेतारण कर्ज ,वाहन कर्ज, वीज बिल भरणा केंद्र, ग्राहकांना लॉकर सुविधा ,पासबुक प्रिंटिंग सुविधा, अल्पदरात सभागृह, एसएमएस सुविधा, गृह तरण कर्ज, आरटीजीएस ,एनईएफटी सुविधा, खातेदारांना तात्काळ पैसे पाठवण्यासाठी आय एम पी एस सुविधा सुरू केली आहे. संस्थेचे चेअरमन राजेश लांजेकर यांच्यासह सर्व संचालक आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
पतसंस्थेला २० ते २५ कोटी ठेवी या गटातील २०२२ चा बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर झाला असून दिनांक १६ मार्च २०२३ रोजी महाबळेश्वर येथे या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सलग सातव्यांदा पतसंस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने पतसंस्थेला मिळालेल्या या पुरस्कारांमध्ये संस्थेचे सर्वसभासद, कर्जदार ,ठेवीदार हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे. या पुरस्कारा बदल अभिनंदन केले जात आहे