मी आत्मनिर्भर- दिवाळी महोत्सवाचे 16 ते दि. 19 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन.

Google search engine
Google search engine

मी आत्मनिर्भर- दिवाळी महोत्सवाचे 16 ते दि. 19 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन.

रविवारी दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलमताई राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

कुडाळ प्रतिनिधी नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्था, सिंधुदुर्गच्या वतीने दुसर्या मी आत्मनिर्भर- दिवाळी महोत्सवाचे आयोजन या दि. 16 ते दि. 19 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलमताई राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी दिली.
सदरच्या या महोत्सवाला बद्दल माहिती देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा संध्या तेरसे यांनी कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी संस्थेच्या सचिव दिप्ती मोरे, रेखा काणेकर, अनुजा सावंत, प्रज्ञा राणे, मुक्ती परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी आत्मनिर्भर या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. दोन वर्षापूर्वी स्वतःच्या पायावर उभे राहणार्‍या महिला या अडचणीत आल्या होत्या. या सर्व महिलांना चांगले व्यासपीठ मिळावे या करिता गेल्या वर्षापासून आम्ही संस्थेच्या वतीने मी आत्मनिर्भर – दिवाळी महोत्सव हा उपक्रम सुरू केला. गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाही या उपक्रमाचे आयोजन दिनांक 16 ते दिनांक 19 ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी 3 ते रात्री 9 वाजता या वेळेत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन निलम राणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात दिवाळी सणा साठी लागणाऱ्या सर्व वस्तू ठेवण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांग बांधवांनी केलेल्या उत्पादना करिता मोफत स्टॉल ही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्योजक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वाटचाल सुरू आहे. या महोत्सवाला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाठबळ मिळाले आहे.
या महोत्सवात केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती, लहान-मोठे उद्योग करण्यासंदर्भात जे काही आवश्यक बाबी यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ज्या विविध क्षेत्रात असे उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिला त्यांचे अनुभव कथन कथन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाठबळ मिळाले आहे.