सारथी मार्फत कुणबी, मराठा समाजाला मोफत प्रशिक्षण : रोजगाराचीही संधी
युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
पाटपन्हाळे (वार्ताहर) सारथी आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत मोफत सीएसएमएस या रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास सुरुवात झाली आहे. दहा हजार मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा तरुणांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. स्थानिक ते जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या उत्तम संधी यातून मिळणार आहेत.
वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या तरुणांची रोजगारक्षमता, स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढण्यासाठी सारथीने रोजगाराभिमुख पदविका उपक्रमास सुरुवात केली आहे. या माध्यमातून डिजिटल कौशल्ये, टॅली, डेटा एन्ट्री, डेटा मॅनेजमेंट, अकाउंटिंग,ॲडव्हान्स एक्सेल,वेब डिझायनिंग, डीटीपी,हार्डवेअर अँड नेटवर्किंग,कम्युनिकेशन स्किल,
इंग्रजी भाषा कौशल्ये, संभाषण कौशल्ये, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दहा हजार तरुणांना देऊन स्थानिक ते जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेतील संधींसाठी विकसित करण्याचे काम केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी 9657898382/ 9657319451/9422570088 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे