दापोलीत लवकरच सायन्स पार्क

दापोली | प्रतिनिधी  : मौजे दापोली शहरालगत किंवा शहरात लवकरात लवकर योग्य जागा उपलब्ध झाल्यास सायन्स पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. रत्नागिरी येथे उभारलेल्या थ्रीडी तारांगणाच्या धर्तीवर दापोलीतील गिम्हवणे येथे सायन्स पार्क मंजूर झाले आहे. दापोली, मंडणगड, आमदार कदम यांनी दापोली तालुक्यातील आंजर्ले येेथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी गिम्हवणे येथील सायन्स पार्कसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले होते.