दापोली | प्रतिनिधी : तालुका पंचायत समिती पुरस्कृत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात आजपासून सुरु झाल्या. दोन दिवस चालणार्या या क्रीडामहोत्सवात सहा प्रभागातील निवडक विद्यार्थी भाग घेत असून,यामध्ये प्राविण्य दाखवणार्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेता येणार आहे.पहिल्याच दिवशी मुलगे सांघिक आणि मुली वैयक्तिक तसेच लंगडी हे प्रकार पार पडले.
यावेळी खोखो आणि लंगडीमध्ये गावतळे तर कबड्डीमध्ये दापोली प्रभाग अव्वल ठरले.
सदर स्पर्धांचे उद्घाटन महाराष्ट्र बॅंक शाखा दापोलीचे व्यवस्थापक आणि क्रीडामहोत्सवातील सर्व स्मृतीचिन्ह आणि मेडलचे देणगीदार सुनिल वानखेडे,सहाय्यक बिडीओ सुनिल खरात,गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव,क्रीडामहोत्सवाचे प्रमुख नोडल अधिकारी रामचंद्र सांगडे,सर्व संघटनांचे पदाधिकारी आदिंच्या हस्ते संपन्न झाले.तत्पूर्वी दापोलीचे बिडिओ आर.एम.दिघे, गटशिक्षणाधिकारी,सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,विविध विषय समिती सदस्य,यांचे पूष्प देऊन स्वागत करणेत आले.यावेळी आरोग्याधिकारी मार्कंडे साहेब,तालुक्यातील अनेक शिक्षक,व स्पर्धक उपस्थित होते.
प्रारंभी शशिकांत बैकर यांनी सर्वांना क्रीडा शपथ दिली. आणि दिवसभर सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा संपन्न झाल्या.
शेवटी सायंकाळी मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करणेत आले.सुत्रसंचालन संजय मेहता आणि विजय फंड यांनी केले.