चिंदर पोसेपाणी येथे 7फेब्रूवारी रोजी डबलबारी भजनाचा सामना

आचरा | अर्जुन बापर्डेकर :
श्री देव गवळदेव व श्री निरंकारी ब्राम्हण देव चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे मंगळवार सात फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त सकाळी भगवती देवीला,गवळदेव, निरंकारी ब्राम्हण देव अभिषेक, सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा. दुपारी महाप्रसाद, दुपारी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी पाच वाजता चिंदर भटवाडी मंडळाची फुगडी.सायंकाळी सहा वाजता स्थानिक भजने,दीपोत्सव आदी कार्यक्रम. रात्रौ साडेनऊ वाजता बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी तर्फे करण्यात आले आहे.