सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव असलेल्या आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी सावंतवाडीतील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा केली.
आंगणेवाडी नियोजन मंडळाच्या माध्यमातून व गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेऊन सकाळपासून ते रात्रीपर्यंत ही सेवा बजावली.
यावेळी आंगणेवाडी देवस्थानचे अध्यक्ष भास्कर आंगणे तसेच काका आंगणे व तेथील अन्य सदस्यांनी गवाणकर कॉलेजचे प्राचार्य व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत दरवर्षी असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी गवाणकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंगणेवाडी जत्रोत्सवात स्वयंसेवक म्हणून सेवा