खेरवसे येथे १७ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

लांजा | प्रतिनिधी : तालुक्यातील खेरवसे येथे १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता जिल्हास्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ग्रामविकास मंडळ खेरवसेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून या जिल्हास्तरीय ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेतील प्रथम विजेत्या ग्रुपला १० हजार रुपये व सन्मान चिन्ह असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच द्वितीय विजेत्यांना रुपये ७००० व सन्मान चिन्ह आणि तृतीय विजेत्या क्रमांकाला रुपये ५००० व सन्मान चिन्ह असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे .या स्पर्धेसाठी ५०१ रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.स्पर्धेबाबत अधिक माहिती आणि प्रवेशासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे ८४४६३०११०६, ९७६४७६१२५५ आणि ८५५२०९६४९५ . तरी जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.