कोट गावच्या सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते झाले क्रांतीज्योत फेरीचे उद्घाटन
लांजा येथे लोकमान्य वाचनालय या ठिकाणी करण्यात आले क्रांतीज्योत फेरीचे स्वागत
आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सुरुवात
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने आयोजन
संतोष कोत्रे | लांजा– रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो अशा घोषणा देत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मुळगाव असलेल्या कोट येथून रविवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरीचा शुभारंभ कोट गावच्या सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते या क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर ही क्रांतीज्योत लांजा, तळवडे, सालपे, शिपोशी, भांबेड, वाटुळ तळवडे मार्गे पाचल कडे रवाना झाली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन हे १० फेब्रुवारीपासून राजापूर तालुक्यातील तळवडे येथे होत आहे. या संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योत फेरीला रविवारपासून सुरुवात झाली लांजा तालुक्यातील मुळगाव असलेल्या राणीच्या कोट येथील गावी कोटच्या सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते या क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गजानन साळवी, तसेच प्रकाश पाटोळे, दिनकर नेवाळकर, लोकमान्य वाचनालयाचे लांजाचे संचालक विजय हटकर, चंद्रकांत खामकर, अमर खामकर, राजू नेवाळकर, राजू सुर्वे, रुपेश दळवी, मिलिंद पाध्ये, माजी सैनिक बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
ही क्रांतीज्योत फेरी सकाळी साडेदहा वाजल्याच्या दरम्याने लांजा येथील लोकमान्य वाचन या ठिकाणी आली. या क्रांतीज्योतीचे माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे, तसेच वाचनाचे संचालक विनोद बेनकर, माजी अध्यक्ष विजय नारकर यांनी स्वागत केले .याप्रसंगी सुभाष लाड, यांच्यासह वाचनाच्या ग्रंथपाल संगीता उपशेट्ये, विजय हटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर ही क्रांतीज्योत फेरी लांजा येथून तळवडे सालपे शिपोशी भांबेड वाटूळ मार्गे तळवडे गावाकडे रवाना झाली.