विठ्ठलादेवीला चांदिची प्रभावळ आणि मुख प्रदान!

Google search engine
Google search engine

 

मसुरे | प्रतिनिधी

पेडणे गोवा येथील विठ्ठलादेवी-वारखंड आयोजित विठ्ठलादेवी भंडारा औचित्याने दि. ५ फेब्रुवारी रोजी विठ्ठलादेवीला तेथील रहिवाशी सौ. शलाका श्रीधर मावळंकर यांनी चांदिची प्रभावळ आणि मुख प्रदान केला. शिवाय सौ. वैशाली मनोज नायक-मुंबई यांसकडुन देवीला नथ प्रदान केली.
यावेळी नक्षीकार श्री. संजय धारगळकर, श्री. एकनाथ मावळंकर, सौ. शलाका श्रीधर मावळंकर, श्री. आना परब, श्री. ज्ञानेश्वर परब(श्री शांतादुर्गामाऊली संस्थान अध्यक्ष), श्री. श्रीधर मावळंकर आणि श्री. बाबा परब(श्री शांतादुर्गामाऊली संस्थान सरचिटणीस) उपस्थित होते.