असलदे गावाने दिलेले प्रेम कदापि विसरणार नाही – पंढरी वायगंणक

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरी वायगंणकर यांचा सत्कार..

कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेली असलदे ग्रामपंचायत आहे. नळपाणी योजना, विविध विकासकामे आणि विविध पुरस्कार देखील ग्रामपंचायत मिळवलेले आहेत. गावातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले गेली,दहा वर्ष सातत्यापूर्वक काम करत असताना नागरिकांनी विश्वास टाकला. त्यामुळेच मला आदर्श सरपंच पुरस्कार सन्मान तीन राज्यातून मिळाला आहे,असे प्रतिपादन सरपंच पंढरी वायगंणकर यांनी केले. पुढील काळात नागरिकांनी पाठीशी रहावे,असे आवाहन त्यांनी केले.

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच पंढरी वायगंणकर यांचा सत्कार चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,उपसरपंच संतोष परब,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,सोसायटी संचालक उदय परब, शामराव परब, संतोष परब, परशुराम परब , कांचन लोके, सुनिता नरे, छत्रुघ्न डामरे, प्रकाश खरात,गणपत शिंदे,सचिव अजय गोसावी,मधुसूदन परब,प्रकाश वाळके आदी उपस्थित होते.

चेअरमन भगवान लोके म्हणाले,असलदे गाव महामार्गाला लागून आहे,या गावाला प्रगतीकडे नेण्यासाठी अहोरात्र काम
सरपंच पंढरी वायगंणकर करत आहेत.त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे,त्यामुळे आम्ही विकास संस्थेच्या माध्यमातून सत्कार शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

फोटो..

असलदे येथे विकास सोसायटीच्या वतीने आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच पंढरी वायगंणकर यांचा सत्कार करताना चेअरमन भगवान लोके सोबत व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, बाबाजी शिंदे ,संतोष परब यांच्यासह सोसायटी संचालक व नागरिक.