दैनिक मुंबई सकाळचे माजी संपादक-आरोंदा गावचे सुपुत्र पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर

 सिंधुदुर्गचे माणिकमोती 

डाॕ.बाळकृष्ण रामचंद्र लळीत.
(9665996260)

कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतलेले राधाकृष्ण नार्वेकर दि.१जून २०२१ रोजी निधन पावले, मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांनी त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केलेच पण काही संपादकांंनी त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे लेखन प्रसिद्ध केले.
मी महाविद्यालयात सावंतवाडी असताना २/३वेळा त्यांना प्रत्यक्ष ऐकले होते. अगदी सरळ साधे पण अभ्यासपूर्ण विचार मांडताना ही त्यांच्या निर्मळ प्रबोधनाचीजाणीव होत असे, अशा तळमळीने बोलणारीअभ्यासू माणसे आता समाज जीवनात कमी होत आहेत. हे एक कटू सत्य आहे .
आपल्या सावंतवाडी तालुक्यातील गोमंतक सिमेवरील निसर्गरम्य व सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीने जनतेला प्रबोधन करणारे गाव म्हणजे आरोंदा…नाटककार आत्माराम भेण्डे,’ बारापाच देवस्थान ‘या विषयावर मुलभूत संशोधन करणारे नीलकंठ विठ्ठलराव नाईक यांचे हे गाव.
अशा आरोंदा गावावर ,परिसरावर मनापासून प्रेम करणारे,वारंवार आपल्या गावी येणारे राधाकृण नार्वेकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३९ रोजी एका सुखी समाधानी घराण्यात झाला..पण गावाकडून मुंबईत दाखल झाल्यावर त्यांना ‘गरुडाचे पंख ‘ फुटले व निवडलेल्या शिक्षक व पत्रकार क्षेत्रात त्यांनी शेवटपर्यत कार्य केले.
राधाकृष्ण राजाराम नार्वेकर.आरोंदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्गबी.ए. बी. एड्.पर्यत शिक्षण घेतलेल्या राधाकृष्ण मुंबईत सुरवातीला मराठा हायस्कुल शिक्षकीपेक्षा स्वीकारला. पण लेखनकलेतील प्राविण्यामुळे पुढे ते धडाडीचे पत्रकार बनले. बातमी लेखन करू लागले. संपादक म्हणून ते काम करू लागले.पुढे मुंबई मराठी पत्रकार संघाचे १९७५-७६ याकाळात ते अध्यक्षही झाले.विश्वस्त म्हणून १९९१-१९९६ होते.पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने १९७५ मध्ये लोणावळा येथील कै. दि. गो. तेंडुलकर स्मृति मंदिराच्या उभारणीत पुढाकार घेतला.
जागतिक मराठी अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून काही काळ काम पाहिले.’मराठी वाचवा मराठी टिकवा’ या चवळीमध्ये प्रत्यक्ष सहभाग त्यांनी घेतला. हे करत असताना आपल्या जन्मगावाला ते विसरले नाहीत
आरोंदा ग्रामोन्नती मंडळ या संस्थेचे उपाअध्यक् म्हणूनही कार्य करत राहिले.श्रीमती सुशिला परांजपे धर्मदाय न्यास, शहापूर या संस्थेच्या कार्यात सहभागी झाले मुंबईत
‘कोकण जत्रा’या उपक्रमाची मुंबईत सुरुवात करणाऱ्यापैकी ते एक होते पत्रकार ,संपादक म्हणून कार्यरत असतानाही
विविध उपक्रमातील त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता.
उदाहरणार्थ -कोकण रेल्वेच्या समभाग विक्रीची चळवळ.
अमेरिकेत १९८३ पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे समवेत ते पत्रकार प्रतिनिधी म्हणून गेले होते. तर जपानला १९९२ साली पंतप्रधान श्री.नरसिंहराव यांचे समवेत गेले होते.पुढे रशियाला १९९६ साली पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे समवेत गेले.इस्राईल येथे १९९८ जागतिक मराठी परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. अधिवेशननिमित्त बांगलादेश १९९९ पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे समवेत राज्य व देशपातळीवरील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, नागरी सुविधा- समस्या, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती,
परदेश प्रवास, देशविदेश संबंध. अशा अनेक विषयांवर लेख अग्रलेख,मुलाखती याद्वारे भरपूर लेखन त्यांनी केले.शिवाय जन प्रबोधन व्हावे म्हणून
आकाशवाणी, दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग घेतला.
पत्रकारिता,संपादकीय काम करत असतानालेखन कार्य चालू ठेवले.१) मनातली माणसं
२) नेहरू ते वाजपेयी (भारतीय पंतप्रधान आणि त्यांची कारकिर्दी) आणि अलिकडे प्रसिद्ध झालेले ‘सेवानिवृत्तीनंतर पुढे का?हे पुस्तक विशेष चर्चेचा झाले. कारण त्यातून त्यांनी केलेले मार्गदर्शन मांडलेले विचार अनेकांना प्रेरणादायी ठरले. मंगळवार दि.१ जून २०२१ रोजी त्यांचे वयाच्या ८२व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
दै. सकाळने त्यांना आदरांजली वाहताना लिहिले,”
“‘मुंबई सकाळ’ चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार श्री राधाकृष्ण नार्वेकर हे कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते घरी परतले होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी सौ क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली जयश्री व शिल्पा जावई आणि खूप मोठा आप्तपरिवार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.”
” आपली लेखणी समाजहितासाठी झिजवणारा आणि पत्रकारितेतील नव्या पिढीला बातमीदारीची ओळख करून देणारा निर्भीड पत्रकार गमावला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या ,” “कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा, नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. वसई-विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारासह अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत.लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांनी पत्रकार हिताच्या अनेक योजना राबवल्या होत्या.मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं झटण्याची, लोकाभिमुख पत्रकारितेची प्रेरणा देणारे नार्वेकर म्हणजे पत्रकारितेचे विद्यापीठ होते.”
सहृदयी संपादक या लेखात दै ‘महाराष्ट्र टाईम्स’ने (२जून २०२१) लिहिले
“पत्रकारितेचा धर्म जपणारा आणि माणुसकीचे मर्म जाणणारा सहृदयी संपादक असे ज्यांचे वर्णन करता येईल, त्या ज्येष्ठ पत्रकार,माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाने अवघी पत्रकारसृष्टी काही क्षण मूक झाली.”
पुढे ते लिहितात-
“पत्रकारितेचा धर्म जपणारा आणि माणुसकीचे मर्म जाणणारा सहृदयी संपादक असे ज्यांचे वर्णन करता येईल, त्या ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाने अवघी पत्रकारसृष्टी काही क्षण मूक झाली. पदाचा, अधिकाराचा आणि लेखणीचा वापर केवळ लोकोपयोगी कामांसाठी करणारा नार्वेकरांसारखा पत्रकार विरळा. त्यांची वृत्ती सजग वार्ताहराची होती. चुका काढण्यापेक्षा, त्या दुरुस्त कशा करता येतील, अशा विधायक दृष्टीनेच त्यांनी कायम पत्रकारिता केली; त्यामुळेच अनेकदा त्यांच्या लेखणीचे फटकारे खालेल्या राजकीय नेत्यांशीही त्यांचे संबंध सौहार्दाचे राहिले. ‘नवाकाळ’ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी ‘नाही रे’ वर्गातील जनसामान्यांसाठी लढण्याची भूमिका पत्करली, ती पुढे ‘मुंबई सकाळ’चे संपादकपद सांभाळताना आणि पुढेही कायम ठेवली.प्रकल्पग्रस्त,पोस्टाचे कर्मचारी अशा अनेक लढ्याला त्यांनी लेखणीतून बळ पुरवले. अत्यंत साधी राहण आणि सामान्यांबद्दलचा कळवळा जाणवत असे”
” गिरणी कामगार,प्रकल्पग्रस्त, पोस्टाचे कर्मचारी अशा अनेकांच्या लढ्याला त्यांनी लेखणीतून बळ पुरवले.अत्यंत साधी राहणी आणि सामान्यांबद्दलचा कळवळा, यांतून त्यांचे संपादकीय व्यक्तिमत्व घडले. त्यांच्या संपादकत्वाखाली काम करणे, हे निव्वळ पत्रकारितेचे शिक्षण नसे, तर प्रत्येक कामाच्या तळाशी माणुसकीची भूमिका कशी राखली पाहिजे, याचा धडा ते आपल्या कामातून, वागण्या-बोलण्यातून देत. त्यांनी लिहिलेल्या आठवणींमधून, पुस्तकांमधूनही हेच जाणवते. काही वर्षांपूर्वी त्यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली, तेव्हा ते कोणत्याही पदावर नव्हते; मात्र निमंत्रितांची आणि निमंत्रित नसूनही केवळ प्रेमाखातर आलेल्यांची अलोट गर्दी झाली होती.एरवी कायम हसतमुख असलेल्या नार्वेकरांचा गळा आपले ते वैभव पाहून दाटून आला.त्यांच्यासोबत काम करून पुढे विविध वृत्तपत्रांत मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्यांचे अपार कौतुक त्यांना होते. या सर्वांच्या ते सतत संपर्कात असत. काही आवडले, कौतुकही करत. गेली काही वर्षे तब्येतीच्य तक्रारी सुरू होत्या; मात्र त्याविषयी फार बोलायला त्यांना आवडत नसे. दुर्दैवाने संसारात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचेही कोरोना काळातच निधन झाले.
(म.टा. २/६/२०२१)
अशा आपल्या आरोंदा गावच्या या सिंधुरत्नांचे मराठीतील सहृदयी , अभ्यासु पत्रकार म्हणून आठवण जपली पाहिजे..त्यांच्या स्मृती जागवल्या पाहिजेत. याकामी सिंधुदुर्गात त्यांचे आप्त,मित्र, वा जवळचे स्नेही,सहकारी श्री.शिवाजी धुरी पुतणे प्रकाश नार्वेकर व कुटुंबीय
नक्कीच काही उपक्रम सुरू करतील.अशी मला आशा वाटते. नाही तर ‘काळ’ मानवाचे जीवन कार्य’ विस्मतीच्या जबड्यात गिळंकृत करायला टपून बसलाच आहे….!
—————————–
संदर्भ –
१) दै.सकाळ २/६/२०२१
२) दै. म.टा. २/६/२०२१
३) रत्नकांत नाईक
यांच्या सौजन्याने आरोंदा घराचे छायाचित्र.