जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी करणार साजरे
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या माजगांव येथील समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून ९९ वी जयंती त्यांचे सुपुत्र तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भाई सावंत यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. यावेळी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आले. यावेळी नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्थेचे सचिव व्ही.बी.नाईक, खजिनदार सी. एल. नाईक प्रा.बाळासाहेब नंदीहळी रवींद्र मापसेकर, सतीश बागवे, अमोल सावंत, सोनाली सावंत, सौ. अर्चना अमोल सावंत, प्रा. नारायण देवरकर, प्रा. धीरेंद्र जाधव होळीकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक शैलेश नाईक, माजी मुख्याध्यापक कृष्णा परब, प्रल्हाद सावंत, देविदास कोरगावकर, प्रा. राहुल कदम संदीप सुखी, संजय कानसे, मनोहर वेंगुर्लेकर, तसेच भाईसाहेब सावंत यांचे पणतू कुमार कबीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान, भाईसाहेब सावंत यांचे ९९ जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. यावेळी स्वर्गीय भाईसाब सावंत यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे यावर्षी भाईसाहेब सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरी करण्यात येईल, असे यावेळी डॉ. दिनेश नागवेकर यांनी सांगितले.