दापोली : होळी सण रंग उधळण्याचा आनंद उत्साहाचा सण.या शिमगोत्सशात कुठे धुलीवंदन तर कोकणात रंगपंचमी ला सुख्या आणि ओल्या रंगांची उधळण केली जाते. मात्र अनेक रासायनिक रंगांमुळे त्वचा आणि डोळ्यांचे आजार बळावतात. हे रंग न वापरता पाण्यात विरघळणारे बीट, मेहंदि ,पालक ,लाल भेंडीची फुले,शेंदूर ,गुलाबी व जांभळी अस्टरची फुले आणि मका व तांदुळाचे पीठ वापरून तयार करण्यात आलेले. तयार केलेले शंभर टक्के नैसर्गीक रंग वापरण्याचे आवाहन निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.
संस्थेतर्फे हे नैसर्गीक रंग फेब्रूवारी अखेर पर्यंत उपलब्ध करण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि हौशी रंगप्रेमींनी या नैसर्गिक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन निवेदिता प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले असून या रंगांच्या बुकिंग करिता 15 फेब्रूवारी पर्यंत संस्थेच्या जालगांव येथील कार्यालयात अथवा अपना स्वीट्स जालगाव येथे नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 9561142078 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.