माता रमाई जंयतीसाठी तालुक्यात दाखल होणाऱ्या हजारो आंबेडकरी अनुयांयाचे रिपाइंकडून स्वागत

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : माता रमाई यांच्या 125 जंयतीकरिता मंडणगड मार्गाने वणंद येथे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यासाठी भिंगळोली समर्थनगर येथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. 6 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस निरिक्षक शैलजा सावंत यांच्या उपस्थित माता रमाई यांना अभिवादन करुन स्वागत समारंभाची सुरुवात करण्यात आली यावेळी दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, रिपाइं जिल्हासरचिटणीस तथा नगरसेवक आदेश मर्चंडे, सौ.मनिषा मर्चंडे, मनिषा खैरे, सुनील तांबे, सुप्रिया लोखंडे, शीतल मर्चंडे, संकेत तांबे, किरण पवार, विजय खैरे, गौरव मर्चंडे, विधान पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. माता रमाई यांचे जंयतीचे कार्यक्रमाकरिता मुंबई व पुणे महानगरासंह राज्यातील हजारो पर्यटक मंडणगड तालुक्याचे मार्गाने वणंदमध्ये दखल झाले. लाबं पल्याच्या प्रवासामुळे येणारा थकवा महिला व वृध्द व रुग्णाच्या समस्या लक्षात घेऊनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्याकडून अनुयायांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी मार्गदर्शनाखाली पन्नास स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी या करिता मेहनत घेतली. यात पाणी वाटप सरबत वाटप, अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. जितेंद्र जाधव, स्वप्निल धोत्रे, संकेत तांबे, विरेंद्र जाधव, रुपेश मर्चंडे, नागसेन तांबे, रामदास खैरे, संदेश खैरे या युवक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
कोट –
माता रमाई यांच्या जंयत्ती निमीत्त त्यांच्या दापोली तालुक्यातील वणंद या मुळगावास भेट देण्यासाठी व माता रमाई यांना अभिवादन करण्याकरिता राज्यभरातून सुमारे वीस ते पंचवीस हजार अनुयायी वणंद येथे दाखल होतात यातील आठ ते दहा हजार अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडणगड तालुक्यातील मुळगाव आंबडवे येथील बाबासाहेबांच्या स्मारकासही भेट देतात राज्यभरातील आंबेडकरी अनुयायी तालुक्यात दाखल होत असताना त्यांची अव्यवस्था होवू नये याकरिता कोणतीही व्यवस्था प्रशासकीय पातळीवरुनही उभी करण्यात येत नाही ही बाब लक्षात घेऊन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने यंदा 6 व 7 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसांचे कालावधीत समर्थनगर दापोली फाटा या ठिकाणी अनुयायांचे स्वागत करण्यात आले. . दुरवरुन प्रवास करुन आलेल्या अनुयायांकरिता पाणी, चहा, अल्पोपहार, महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छता गृहे, आसन व्यवस्था व विश्रांतीची आपत्तकालीन वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती व या उपक्रमास अनुयायांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
– आदेश मर्चंडे सरचिटणीस रिपाइं. जिल्हा रत्नागिरी.