राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेकरिता आदीवासी आश्रमशाळा वेरळ येथील दोन विद्यार्थ्यांची निवड

Google search engine
Google search engine

मंडणगड | प्रतिनिधी : आदिवासी विकास ठाणे विभागाचे आंतर्गत 1 ते 3 फेब्रुवारी 2023 या तीन दिवसाचे कालवाधीत ठाणे शहापूर येथे घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वेरळ येथील संतोष पवार इयत्त दहावी, रुपेश निकम इयत्ता आठवी यांनी सतरा व चौदा वर्षाखालील वयोगटात भालाफेक व हँडबटल या क्रिडा प्रकारात नेत्रदिपक कामगीरी करत प्रथम क्रमांक मिळवीला त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ठाणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत शहापूर, पेण, जव्हार ठाणे, घोडगाव, सोलापूर या सहा प्रकल्प संघानी व पाचशेहून अधिक शाळांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत आदीवासी आश्रमशाळा वेरळ येथील सोळा विद्यार्थी प्रकल्पस्तरावर उत्तम कामगीरी नोंदवून सहभागी झाली होते. विभागीय स्पर्धेकरिता पेणे प्रकल्प संघातून हे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते नाशिक येथे 10 ते 12 फेब्रुवारी 2022 या तीन दिवसाचे कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत शाळेच्या इतिहासात प्रथमच शाळेचे दोन विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाल्या प्रकल्पअधिकारी पेण श्रीमती शशिकला अहिरराव, सर्व अधिकारी शाळव्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थ, मुख्याध्यापक एम.एम. खामकर, व प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.