वाळू वाहतूक वादावार तोडगा काढण्यात यश
गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र भाजप नेते निलेश राणे, गोवा मांद्रे आमदार जीत आरोलकर यांच्यात बैठक
गोवा, महाराष्ट्र वाळू वाहतूक ट्रक वाहन संघटना पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
चर्चेअंती सकारात्मक निर्णय
मालवण | प्रतिनिधी : गोवा आणि महाराष्ट्र सिंधुदुर्ग येथील वाळू वाहतूक व्यावसायिक यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले आहे. गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, गोवा मांद्रे येथील आमदार जीत आरोलकर तसेच गोवा, महाराष्ट्र वाळू वाहतूक ट्रक वाहन संघटना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. त्यामुळे महाराष्ट्र सिंधुदुर्ग तील वाळू गोवा राज्यात उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या यशस्वी शिष्ठाईमुळे वाळू वाहतूक ट्रक संघटनामधील वाद मिटला आहे. आता पूर्वी प्रमाणे महाराष्ट्र सिंधुदुर्ग येथील वाळू वाहतूक ट्रक गोव्यात येतील. बांधकामसाठी वाळू उपलब्ध होईल. रेती टंचाई दुर होईल. असे गोवा राज्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
याबाबत निलेश राणे म्हणाले, गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नांवर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रमोदजी सावंत यांनी वाळू व्यवसायीकांची बाजू समजून घेतली व तोडगा काढला आहे.
महाराष्ट्र येथून वाळू घेऊन येणारे ट्रक संघटना आणि गोवा येथील ट्रक संघटना यांच्यात गैरसमजूतीतून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. गोव्यात रेती बंद होती. याचा बांधकाम व्यावसायावरही परिणाम झाला होता.
यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, गोवा मांद्रे येथील आमदार जीत आरोलकर यांच्या पुढाकारातून गोवा, महाराष्ट्र येथील वाळू वाहतूक ट्रक संघटना पदाधिकारी यांच्यात गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत तोडगा काढण्यात यश आले आहे. महाराष्ट्र येथून वाळू ट्रक गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.