खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील खांबतळे येथील झोपडपट्टीत घुसलेल्या हरण टोळ जातीच्या सापास वन विभागाच्या पथकाने जीवदान दिले. सापास सुखरूप ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
येथील झोपडपट्टीत साप घुसल्याची माहिती मिळताच त्या बचाव करण्यासाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. बचावकार्यात वनरक्षक रानबा बंबर्गेकर, वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सुरज जाधव, सुमित म्हाप्रळकर यांचा समावेश होता.