व्यापारी संघटना जिल्हाध्यक्षपदी बिपीन पाटणे

 

खेड (प्रतिनिधी) शहरातील दीप इंटरप्राईजेसचे मालक व उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सहकार क्षेत्रात
कार्यरत असलेले बिपीन पाटणे यांची व्यापारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड
करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या बिपीन पाटणे यांनी व्यापाऱ्यांना एकसंघ करत त्यांच्या न्यायहक्कांसाठी सदैव लढा दिला आहे. रोटरी प्रतिष्ठानच्या चेअरमनपदाच्या माध्यमातून रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली असून विद्यमान संचालकही आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे.