खेड(प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे १९ जानेवारीला खेडमधील भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यातील सहभागासाठी बेरोजगारांना www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेरोजगारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन या केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
बेरोजगारांप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/ उद्योजकांनी आपल्याकडील रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहनही शेख यांनी केले आहे. बेरोजगारांसाठी ही मोठी संधी असून, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.