बोरज येथे कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण सांगता

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बोरज- शिंदेवाडी येथे येथील दत्त मंदिरात दत्तजयंती उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सवासह
ज्ञानेश्वरी पारायणाची उत्साहात सांगता झाली.

यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवांतर्गत ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, हरिजागर, काकड आरती, दत्त अभिषेक, होमहवन, महाआरती, भजन, मंत्रपठण, हरिपाठ, दत्तजन्मोत्सव, प्रदक्षिणा, हरिकीर्तन वगनाट्यासह काल्याचे कीर्तन, कालाप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले.