खेडमध्ये १ जानेवारीला सामूहिक विजय मंत्रजप

 

खेड (प्रतिनिधी) अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून १ जानेवारी रोजी शहरातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत सामूहिक विजय मंत्रजप (रामजप) होणार आहे.

यावेळी १३ लाख राम नाम जपाचा संकल्प आहे. शहरासह ग्रामीण भागातील बहुसंख्य रामभक्तांनी या संकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लक्ष्मी नारायण देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सरपंच विजय केळकर (९९२३१२०८६८) यांच्याशी संपर्क साधावा.