खेड(प्रतिनिधी) शासनाच्या भात खरेदी योजनेंतर्गत तालुक्यासाठी भात खरेदीसाठी सबएजंट म्हणून तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार बेरळ-खोपी फाटा गोदाम येथे संघाचे अध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याहस्ते भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यंदा भाताला २१८३ क्विंटल रूपये दर मिळणार असून ऑनलाईन नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भात संघाकडे विक्रीसाठी देवून शासन योजनेचा लाभ घ्यावा. यात काही अडचणी आल्यास तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष जाधव यांनी केले आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, संचालक विष्णू मोरे, अंकुश कदम, शेखर दळवी, प्रकाश कडू, शामराव मोरे, प्रफुल्ल मोरे, सुजित भुवड, श्रीधर गवळी, संचालिका सिध्दी पवार, यशवंत भोसले, लक्ष्मण सुर्वे, विश्वास सुर्वे, जल्लालउद्दीन कादिरी, उज्ज्वला कदम, संघ व्यवस्थापक सचिन कुळे, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.