सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात नाही ; आमदार नितेश राणे 

आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गातील हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी केले अथक प्रयत्न 

मात्र महायुतीचे सरकार सिंधुदुर्गातील हा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशात आदर्श प्रकल्प होईल  

आमदार नितेश राणेंनी दिला जनतेला विश्वास

कणकवली : कोकणात सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलट – सुलट बातम्या येत आहेत. कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी,आमच्या महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करत आहेत.हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हयातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, २०१८ च्या जवळपास जेव्हा मंत्री दीपक केसरकर हे अर्थ राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही चालना येथील पर्यटनाला दिली नाही. प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला.त्यामुळे या प्रकल्पाचे येथील काम जैसे थेच राहिले. गुजरात आणि केरळ मध्ये हि काम सुरू झाली. हे सगळं आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झालेल आहे.असा घणाघात आम. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.आमचं महायुतीचं सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल, असा विश्वासही आ.नितेश राणे यांनी व्यक्त केला.

जसा पाणबुडीच्या प्रकल्प सिंधुदुर्गात आला तसाच प्रकल्प गुजरात ने करायचा निर्णय घेतला आहे. तसेच गुजरातप्रमाणे केरळ मध्ये देखील असा प्रकल्प सुरू होणार आहे अशी माहिती, आ. नितेश राणे यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे कोणीही आपला प्रकल्प पळवला असे म्हणता येणार नाही,असेही ते म्हणाले.